Monday, 6 March 2017

नागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन!!!!!!!!

           ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे एका हिंदी चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहेत. नागराज मंजुळे यांचा आगामी चित्रपट नेमका कोणता आहे यावरुन अद्यापही पडदा उठला नसला तरीही चर्चा अशाही रंगत आहेत की, ‘सैराट’च्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन नागराज मंजुळेच करणार आहे. करण जोहरची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच्या संहितेवर सध्या काम सुरु असून या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन पहिल्याच वेळेस एकत्र काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. डीएनए ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आगामी चित्रपटासाठीची संहिता नागराज मंजुळेने अमिताभ बच्चन यांना ऐकवली असून ते या चित्रपटासाठी फारच उत्साही असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता येत्या काळात नागराज मंजुळे आणि बिग बी एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी कोणत्या चित्रपटाचा नजराणा सादर करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
          दरम्यान, बिग बी नेहमीच नव्या जोमाच्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढे सरसावत असतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी ‘सैराट’ हा चित्रपट पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया फेसबुक अकाऊंटद्वारे सर्वांसमोर मांडल्या होत्या. ‘सैराट’ चित्रपटाचा एक फोटो पोस्ट करत बिग बींनी ‘मी सैराट हा मराठी चित्रपट पाहिला. अद्भुत…अगदी सोप्या पद्धतीने या चित्रपटातून किती साऱ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत’, असे कॅप्शनही लिहिले होते. त्यामुळे ‘सैराट’ची जादू आजही कायम आहे असेच म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment