Monday, 23 January 2017

Transpire moile phones into drones

                      आपल्या स्मार्टफोनला पंख लाऊन ड्रोन तयार करता येईल यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही.
मात्र हीच प्रणाली ‘फोन ड्रोन इथोस’च्या माध्यमातून विकसित करण्यात आली आहे.जगभरात ड्रोन धमाल करत आहेत. अगदी हौशी लोकांपासून ते विविध व्यवसायांमध्ये याचा विपुल प्रमाणात वापर होत आहे. मात्र यातील बहुतांश ड्रोन हे छायाचित्रीकरणासाठी वापरले जातात. अर्थात यात कॅमेरा हा अविभाज्य घटक असतो. सध्या बहुतेक ड्रोन हे फोर-के या उच्च क्षमतेच्या कॅमेर्‍यांनी युक्त आहेत. यामुळे अतिशय स्पष्ट चित्रीकरण करता येत असले तरी ड्रोनचा आकार आणि वजन वाढते. परिणामी आजचे बहुतांश ड्रोन हे आकार आणि वजनाने बर्‍यापैकी मोठे असतात.
                       यात ड्रोनमध्ये वापरण्यात येणार्‍या कॅमेर्‍याचे वजनही जास्त असते. या सर्व बाबींचा विचार करता स्मार्टफोनलाच चार पंख लाऊन यातील कॅमेर्‍याने चित्रीकरण करता येईल ही संकल्पना समोर आली.
 यातूनच ‘फोन ड्रोन इथोस’ हे अनोखे ड्रोन आकारात आले.‘फोन ड्रोन इथोस’ हे चार पंख असणारे ड्रोन आहे. मात्र यात कॅमेरा नसतो. यात अँड्रॉईड वा आयओएस प्रणालीवर चालणारा स्मार्टफोन अटॅच करण्यासाठी एक सुरक्षित भाग दिलेला असतो. यात स्मार्टफोन ठेवल्यानंतर हे ड्रोन उड्डाणासाठी सज्ज होते.
                       

 

                        या सर्व बाबीचा प्रमुख परिणाम म्हणजे हे ड्रोन आकाराने आटोपशीर आणि वजनाने हलके असते. अगदी कोणत्याही व्यावसायिक ड्रोनप्रमाणे यातून उत्तम दर्जाचे चित्रीकरण शक्य होते.  याचा आकार लहान असल्याने कुणीही अगदी दुर्गम भागात जातांनाही ते आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याची बॅटरीदेखील दीर्घ काळापर्यंत टिकते.

 

 

 

No comments:

Post a Comment